गणना 20:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे; आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही; आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.” Viz kapitola |