यिर्मया 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 असे म्हण, ‘अहो यहूदाच्या राजांनो, व अहो यरुशलेम-निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका; सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, ह्या स्थळावर मी अरिष्ट आणतो, त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांस सांग, यहूदाच्या राजांनो आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा! मी या ठिकाणी अरिष्ट आणणार, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान झिणझिणतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील. Viz kapitola |