यशायाह 18:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या वेळेस उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मुळापासून भयंकर, हुकूमत चालवणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे, त्या लोकांकडून सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश परमेश्वराला नजराणे अर्पण करण्यात येतील.1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या वेळेला, उंच आणि मनमिळावू लोक, भीतीपासून दूर व जवळ असे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाव दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश पमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पण करण्यास येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याकाळी सर्वसमर्थ याहवेहसाठी सीयोनातून भेटी आणल्या जातील धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडून, ज्यांचे भय आहे अशा दूरवरच्या लोकांकडून, विक्षिप्त भाषण करणाऱ्या आक्रमक राष्ट्राकडून, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. अशा लोकांकडून सर्वसमर्थ याहवेह यांच्यासाठी भेटी आणल्या जातील. Viz kapitola |