उत्पत्ती 47:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आपल्यादेखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हांला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हांला अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी ह्यांच्यावर फारोची मालकी होवो; आम्हांला बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडायच्या नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का? आता आम्हाला आमच्या जमिनीसह विकत घ्या म्हणजे आम्ही फारोहचे गुलाम होऊ. अन्नासाठी आम्ही स्वतःचा विक्रय केला तरच आम्ही जगू आणि जमिनीही मोकळ्या राहणार नाहीत.” Viz kapitola |