उत्पत्ती 17:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल, आपल्या घरी जन्मलेले व पैसे देऊन विकत घेतलेले आपले सर्व दास ह्यांना म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून देवाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुंता केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याच दिवशी अब्राहामाने आपला पुत्र इश्माएल आणि आपल्या घरात जन्मलेले किंवा पैसे देऊन विकत घेतलेले सर्व पुरुष यांची परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंता केली. Viz kapitola |