गलतीकरांना 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. Viz kapitola |