एस्तेर 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यहूदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहूद्यांच्या वधाची आज्ञा शूशन नगरात दिली होती त्या राजाज्ञेची प्रतही तिला दाखवण्यासाठी दिली. एस्तेरने राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची याचना व विनंती करावी ही जबाबदारी त्याने तिच्यावर सोपवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मर्दखयाने त्याला शूशनमध्ये जाहीर करण्यात आलेली, सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याच्या राजाज्ञेची एक प्रतही दिली आणि ती प्रत एस्तेरला दाखवून त्यासंबंधी सर्वकाही सविस्तर कळविण्यासही सांगितले. तसेच एस्तेरला तिने राजाकडे जावे आणि तिच्या लोकांसाठी तिने राजाजवळ दयेसाठी रदबदली करावी आणि त्याला विनवणी करावी, अशा सूचनेचा निरोपही त्याने त्याच्याजवळ दिला. Viz kapitola |