एस्तेर 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजांपैकी हथाक ह्याला तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का ह्याची चौकशी कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 एस्तेरने मग हथाकाला बोलावले, हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एकजण होता. हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्यास आज्ञा दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले. Viz kapitola |