उपदेशक 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्याची सारखीच दशा होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते. नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, यज्ञ करणारा आणि यज्ञ न करणारा, या सर्वांची सारखीच गती होते. चांगला मनुष्य पापी मनुष्यासारखाच मरेल. शपथ वाहणाऱ्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा सारखीच होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत. जसे चांगल्या व्यक्तीबरोबर, तसेच पापी व्यक्तीबरोबर; जसे शपथ घेणार्यांशी, तसेच जे ती शपथ घ्यायला घाबरतात त्यांच्याशी. Viz kapitola |