अनुवाद 7:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार, तसेच पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला काढून आणले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हास मिसर देशा बाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हास माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हास भीती वाटत आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढून आणण्यासाठी सामर्थ्यशाली हाताने व पसरलेल्या भुजांनी जी भयंकर संकटे, महान चमत्कार व चिन्हे केली, ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले होते. तुम्हाला ज्या लोकांचे भय वाटते त्यासर्वांच्या सोबत याहवेह तुमचे परमेश्वर हेच करतील. Viz kapitola |