२ शमुवेल 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा दावीद बआल-पेरासीम येथे गेला आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याहवेह माझ्या शत्रूंवर माझ्यासमोर तुटून पडले.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम हे नाव पडले. Viz kapitola |