२ राजे 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांनी नगरांचा विध्वंस केला; सर्व चांगल्या शेतांत प्रत्येक पुरुषाने दगड फेकले, त्यांनी ती दगडांनी भरून टाकली; पाण्याचे सर्व कूप बुजवले, सर्व चांगली झाडे तोडून टाकली; फक्त कीर-हरेसेथ येथे त्यांनी दगडांशिवाय काहीएक राहू दिले नाही; आणि गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली, त्यांच्या प्रत्येक शेतांत दगडांचा मारा करून ते बुजवले. त्यांनी पाण्याच्या सर्व विहिरी बुजवल्या व सर्व चांगली झाडे तोडून टाकली केली. फक्त कीर-हरेसमधे त्यांनी त्यांचे दगड राहू दिले. पण गोफण चालवणाऱ्या सैन्यांनी त्या नगरावर हल्ला केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांनी मोआबाची शहरे उद्ध्वस्त केली. सर्व सुपीक जमिनीत एकएकाने दगडधोंड फेकून ती भरून टाकली. पाण्याच्या विहिरीतील झरे बुजविले आणि सर्व उत्तम झाडे तोडून टाकली. फक्त कीर-हरेसेथ येथील दगड राहू दिले, परंतु गोफणदारांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. Viz kapitola |