२ राजे 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. “त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले.” पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले. Viz kapitola |