२ करिंथ 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेने न देता उदार अंत:करणाने द्यावी; म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी जाहीर केली होती, ती जमा करून तयार ठेवावी, म्हणून तुमच्याकडे माझ्या अगोदर येण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. मी येईन तेव्हा तुमची देणगी तयार असेल आणि हे निदर्शनास येईल की, तुमच्यांवर सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर स्वेच्छेने तुम्ही दान देत आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्यासारखी ती नसेल. Viz kapitola |