२ इतिहास 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 शलमोनाने पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच असा पितळेचा एक चौरंग तयार करून अंगणाच्या मध्यभागी ठेवला होता, त्याच्यावर तो उभा राहिला आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीसमक्ष गुडघे टेकून आकाशाकडे आपले हात पसरून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले. Viz kapitola |