२ इतिहास 32:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुन्हा बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, दावीदपुरातल्या मिल्लो नावाच्या बुरुजाची मजबुती केली आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरूशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत ज्याठिकाणी ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदी बाहेर दुसरा मजबूत कोट केला. दावीद नगरातील मिल्लो नावाच्या बूरूजाची मजबूती केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या. Viz kapitola |