२ इतिहास 23:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे व दाविदाने नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पून आनंदाने गायन करावे म्हणून दाविदाने लेवीय याजकांची परमेश्वराच्या मंदिरात वाटणी करून दिली होती, त्यांच्या हाती यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराचे अधिकार सोपवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर दावीदाने ज्यांची मंदिरात होमार्पणे करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या याजकीय लेव्यांच्या हाती यहोयादाने याहवेहच्या मंदिराची देखरेख सोपविली. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, दावीदाने सांगितल्याप्रमाणे ते आनंद करीत होते आणि गाणी गात होते. Viz kapitola |