१ शमुवेल 29:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले, “ह्या इब्र्यांचे येथे काय काम?” तेव्हा आखीश पलिष्ट्यांच्या सरदारांना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल ह्याचा सेवक दावीद हा नव्हे काय? आज तो कैक दिवस किंबहुना कैक वर्षे माझ्याजवळ आहे : तो त्यांना सोडून माझ्याकडे आला तेव्हापासून आजपर्यंत मला त्याच्यात काही वावगे आढळले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार बोलले, “हे इब्री येथे काय करतात?” मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे. आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सेनाधिकार्यांनी विचारले, “या इब्री लोकांचे येथे काय काम?” आखीशने उत्तर दिले, “हा दावीद नाही काय, जो इस्राएलचा राजा शौल याच्याकडे अधिकारी होता? तो आता एक वर्षाहून अधिक काळ माझ्याबरोबर आहे, आणि त्याने शौलाला सोडले तेव्हापासून आजपर्यंत, मला त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही.” Viz kapitola |