१ शमुवेल 14:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने परमेश्वराच्याबरोबर काम केले आहे.” या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही. Viz kapitola |