प्रकटी 15:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत! Viz kapitola |