प्रकटी 12:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते. तेथे अजगराच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहत असताना साडे तीन वर्षे तिचे पोषण केले जाणार होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तिथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते. Viz kapitola |