मार्क 12:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 “गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी अशी आज्ञा लिहून ठेवली आहे की, कोणा एकाचा भाऊ निधन पावला आणि त्याची पत्नी मागे राहिली व त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने तिच्याबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘कोणाएकाचा भाऊ मेला, आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 “गुरुजी. मोशेने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. Viz kapitola |