मत्तय 18:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तोच दास बाहेर गेल्यावर त्याला त्याच्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडून त्याचे थोडे कर्ज येणे होते. तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, “तुझ्याकडून माझे येणे आहे, ते देऊन टाक.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली. Viz kapitola |