Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 कारण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याचा हुकूम सोडला होता. त्या भुताने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते. साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असता तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते; आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहार्‍यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्याच्यामधून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळ्यांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळ्या तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy