याकोब 3:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे. Viz kapitola |