इब्री 8:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ‘पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी बाळग’, ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता, तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे यहुदी लोकांचे याजकही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.” Viz kapitola |