गलतीकरांना 2:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तरीही मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करू शकत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते होत असते, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे, ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करावेत. नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यमात्रापैकी कोणीही हे करू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही. Viz kapitola |