प्रेषित 27:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ‘पौल, भिऊ नकोस. तुला कैसरपुढे उभे राहिले पाहिजे आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत, ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’ Viz kapitola |