२ करिंथ 5:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जे आम्ही ह्या मंडपात आहोत, ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो. आमच्या ऐहिक शरीराचा त्याग करावा अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर स्वर्गीय वस्त्र परिधान करावे अशी इच्छा आम्ही बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे, ते जीवनाच्यायोगे संजीवित व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो; ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 या तंबूमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही कण्हतो व थकलेले आहोत, वस्त्रे परिधान करू नये असे आम्हास वाटत नाही, परंतु स्वर्गीय निवासस्थान धारण करावे, यासाठी की जे मर्त्य ते जीवनाने गिळंकृत करावे. Viz kapitola |