रूथ 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर मला वाटते की, तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जन ह्यांच्यासमक्ष ती जमीन तू खरेदी करावीस. तुला ती सोडवायची असली तर सोडव; ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल; कारण ती सोडवणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही; तुझ्यामागून माझा हक्क आहे.” तो म्हणाला, “मी ती सोडवतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,” Viz kapitola |