प्रकटी 19:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.” Viz kapitola |