नहूम 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. मी तुझी कबर तयार करेन, कारण तू तिरस्करणीय आहेस.” Viz kapitola |