लूककृत शुभवर्तमान 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस; म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस’; म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 उलट, तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर बस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस.’ अशा प्रकारे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलेले असेल तर खालच्या जागेवर जाऊन बसा, म्हणजे जेव्हा तुमचा यजमान येतो, तो तुम्हाला म्हणेल, ‘मित्रा, चांगल्या जागेवर ये.’ तेव्हा दुसर्या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा सन्मान होईल. Viz kapitola |