योएल 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहसमोर सेवा करणार्या याजकांनी, द्वारमंडप आणि वेदी यांच्यामध्ये रडत उभे राहावे. आणि त्यांनी असे म्हणावे, “हे याहवेह, तुमच्या लोकांना वाचवा, आपल्या वतनाला राष्ट्रांमध्ये अप्रतिष्ठा किंवा चेष्टेचे कारण होऊ देऊ नका. ‘त्यांचा परमेश्वर कुठे आहे?’ असे त्यांनी लोकांमध्ये का म्हणावे.” Viz kapitola |