शास्ते 7:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून सांगितले की, “तुम्ही खाली जाऊन बेथ-बारापर्यंत यार्देन नदीवर नियंत्रण मिळवा आणि मिद्यानी लोकांस आडवा.” म्हणून एफ्राईमाचे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंत यार्देन नदी पार करण्याच्या सर्व वाटा रोखून धरल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 गिदोनाने एफ्राइमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की, “मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ-बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” त्याप्रमाणे एफ्राइमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंतचे उतार रोखून धरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 गिदोनाने एफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात आपले दूत पाठवून हा संदेश दिला, “खाली येऊन मिद्यानाशी लढून बेथ-बाराहपर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” म्हणून एफ्राईमच्या सर्व लोकांना बोलाविण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंत यार्देन नदीचा उतार रोखून धरला. Viz kapitola |