इब्री 12:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर तुम्हास माहीत आहे जेव्हा त्यास वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चात्तापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नाकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चात्तापाची संधी त्याला मिळाली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असताही त्याला नकार मिळाला. त्याने जरी अश्रू ढाळून पश्चात्ताप करायची संधी शोधली, तरी ती त्याला मिळाली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्हाला माहीत आहे की, त्यानंतर तो हा ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असतानाही त्याचा नकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी जे काही त्याने केले होते ते त्याला बदलता आले नाही. Viz kapitola |