इब्री 11:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते. Viz kapitola |