उत्पत्ती 47:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला, हे आम्ही स्वामींपासून लपवत नाही; आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत; आता स्वामींसमोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी ह्यांखेरीज आमच्याजवळ काहीएक राहिले नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ते वर्ष संपल्यावर, पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “आम्ही धन्यापासून हे सत्य लपवू शकत नाही की आमचा पैसा संपला आणि आमची गुरे तुमची झाली आहेत आणि आता आमच्याजवळ आमच्या धन्यासाठी फक्त आमची शरीरे व आमच्या जमिनी राहिल्या आहेत. Viz kapitola |