उत्पत्ती 34:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तीन दिवसानंतर, सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी म्हणजे दीनाचे भाऊ यांनी आपआपली तलवार घेतली व ते नगर बेसावध असता त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तिसर्या दिवशी असे झाले की, ते बेजार असता याकोबाचे दोन मुलगे, म्हणजे दीनेचे भाऊ शिमोन व लेवी ह्यांनी आपापली तलवार हाती घेऊन त्या नगरावर अचानक छापा घातला आणि तेथील सर्व पुरुषांची कत्तल केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली. Viz kapitola |