उपदेशक 9:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. नीतिमान आणि ज्ञानी माणसे व त्यांचे कार्ये समजण्याचा स्पष्टपणे प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या हातात असते. कोणीतरी आपला तिरस्कार किंवा प्रेम करील याबद्दल काहीही माहीत नसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला; ते हे की नीतिमान व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत; आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्याला कळत नाही; हे सर्वकाही त्याला पुढे प्राप्त होणार असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते. Viz kapitola |