अनुवाद 31:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि याहवेह मोशेला म्हणाले: “तू आपल्या पूर्वजांसोबत विसावा घ्यावयास जाणार आहे आणि हे लोक ज्या देशात प्रवेश करणार आहेत, तिथे लवकरच परकीय दैवतांच्या समोर व्यभिचार करतील. ते माझा त्याग करतील आणि मी त्यांच्याबरोबर केलेला करार मोडतील. Viz kapitola |