अनुवाद 16:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टी आहे. तेव्हा आनंदात राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यांत तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हा सण सात दिवस याहवेह तुमचे परमेश्वर जे स्थान निवडतील तिथे साजरा करावा. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला तुमच्या सर्व उत्पन्नात आणि हाती घेतलेल्या तुमच्या कामात आशीर्वादित केले यास्तव तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. Viz kapitola |