प्रेषित 25:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्यास पाहा! याच्याच विषयी यरूशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे, याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा फेस्त म्हणाला, “अग्रिप्पा राजे व आमच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना? ‘ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये’ असे ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमेस व येथेही मला अर्ज केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 फेस्त म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा व उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना! ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुदी लोकांच्या सर्व समुदायाने यरुशलेम व येथेही मला अर्ज केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये. Viz kapitola |