प्रेषित 21:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळविण्यात आले आहे, त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून योग्य प्रकारे वागता हे सर्वांस कळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही. Viz kapitola |