२ शमुवेल 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्यास तो म्हणाला, तामारला माझ्याकडे पाठवा तिला इथे माझ्यादेखत दोन पोळ्या करू द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग अम्नोनाने अंथरुणावर पडून आजार्याचे सोंग केले; राजा त्याच्या समाचाराला गेला तेव्हा अम्नोन राजाला म्हणाला, “एवढे करा; माझी बहीण तामार हिने माझ्याकडे येऊन दोन पोळ्या माझ्यादेखत तयार कराव्यात, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा अम्नोन पडून राहिला आणि आजारी असल्याचे ढोंग केले. जेव्हा राजा त्याच्या भेटीस आला, तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझी बहीण तामार हिने येऊन माझ्या दृष्टीसमोर विशेष भाकरी बनविल्या तर मला आवडेल, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.” Viz kapitola |