२ राजे 3:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले असता, इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. तेव्हा मवाबी लोक पळत सुटले व इस्राएल लोक त्यांच्या प्रदेशातही त्यांना मारत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मवाबी इस्राएलाच्या छावणीनजीक आले तेव्हा इस्राएलांनी उठून त्यांना मार दिला; आणि ते त्यांच्यापुढून पळाले; इस्राएल त्यांना मारत मारत त्यांच्या देशात शिरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पण जेव्हा मोआबी लोक इस्राएलांच्या छावणीकडे आले न आले तोच इस्राएलचे सैन्य उठले आणि ते पळेपर्यंत त्यांच्याशी युद्ध केले आणि त्वेषाने तुटून पडले व त्यांचा संहार करू लागले; आणि मोआबाचे सैन्य इस्राएलांपासून पळू लागले. इस्राएलांनी त्यांच्या देशात प्रवेश केला आणि मोआबी लोकांची कत्तल करत गेले. Viz kapitola |