२ इतिहास 34:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली. Viz kapitola |