२ इतिहास 24:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, “तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हास सोडून देत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या ह्याच्या ठायी आला; त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघता? अशाने तुम्हांला यश येणार नाही; तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हांला सोडले आहे.”’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ” Viz kapitola |