२ इतिहास 14:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी वर्चस्व मिळवू नये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुझ्यावाचून अन्य कोणी नाही; हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून ह्या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा आसाने त्याचे परमेश्वर याहवेहना हाक मारली आणि म्हणाला, “याहवेह, दुर्बल लोकांना पराक्रमी लोकांविरुद्ध मदत करणारे तुमच्यासारखे कोणी नाही. आमच्या परमेश्वरा, याहवेह आम्हाला मदत करा, कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि तुमच्याच नावामध्ये आम्ही या विशाल सैन्याविरुद्ध आलो आहोत. याहवेह, तुम्ही आमचे परमेश्वर आहात; मर्त्य मानवांनी तुमच्यावर विजयी होऊ नये.” Viz kapitola |