१ शमुवेल 16:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शमुवेलाने इशायाला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?” तो म्हणाला, “एक सर्वांत धाकटा राहिला आहे; पण पाहा, तो शेरडेमेंढरे राखत आहे.” तेव्हा शमुवेल इशायाला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा त्यांनी इशायला विचारले, “तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?” इशायाने उत्तर दिले, “अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे.” शमुवेल म्हणाले, “त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही.” Viz kapitola |